Pages

Friday, 25 May 2018

राजकारणात दिखावे पे मत जाओ आपनी अकल लागाओ

मोदींनी राजीनामा दिलाच पाहिजे.. 09 कारणं!!

जातीय, शेतकरी, विध्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका,बँक/पोस्ट कर्मचारी, पेन्शनर, सरकारी कर्मचारी ई ई. आंदोलनांना यश न आल्याने काही विरोधकांनी मला मोदींचा राजीनामा मागण्यासाठी नवं कारण शोधण्यास सांगितलं!! मोदी विरोधकांसाठीं खास 09 कारणे!! (कृपया आभार मानू नका)

1) सैराट नंतर रिंकुताईला कोणाताच नवा मोठा चित्रपट मिळाला नाही हे मोदींच महिला विषयक धोरणाच अपयश द्या राजीनामा!!

2) माझ्या गावात जिओ सिमकार्ड चालत नाही हे तुमच्या टेली कम्युनिकेशन धोरणाचे अपयश द्या राजीनामा!!

3) फोर वे ची कामे चालू असल्याने ट्रॅफीक जाम होतंय हे तुमच्या विकासाचे अपयश!!

4) जिल्ह्याचा रिझल्ट 99 टक्के लागला तरीही आमचं उनाड मंग्या नापास झालं हे मोदींच शैक्षणिक धोरणाचे अपयश!!

5) चारा छावण्या, दुष्काळ कामे , लोड शेडिंग, हे सगळं बंद होत चाललंय हे तुमच्या रोजगार धोरणाचे अपयश!!

6) 15 मिनिटात जेल मधून बाहेर येणारा आमचा टग्या भाई आज जामिनासाठी वळवळतोय!! हे  न्याय व्यवस्थेचे अपयश!!

7) IPL मुंबई टीम बाहेर पडली हे क्रीडा धोरणाचं अपयश

8) गावठी दारू शोधून घसा कोरडा पडला हे तुमच्या ग्रामविकासाचं अपयश नव्हे तर काय??

9) टमरेलवाडी (बु।) येथील ग्रामपंचायत विरोधी पक्षाच्या ताब्यात गेली, किमान आता तरी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्या!!

अन्यथा देना स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल!!

(ही पोस्ट निखळ विनोदासाठी आहे, ज्यांना मोदी विरोधाच्या काविळीने ही पोस्ट भगवी दिसत असेल त्यांनी कृपया या आधी मी लिहिलेल्या मनमोहन सिंग, जयराम रमेश, इंदिरा गांधी, शास्त्रीजी (सर्व काँग्रेस) मधू दंडवते (जनता दल) बाळासाहेब ठाकरे, आमदार उदय सामंत (शिवसेना), यांचे विषयी चांगल्या पोस्ट वाचाव्यात!!!)

amitsamant88.blogspot.com

No comments:

Post a Comment