संध्या *अलक* (अती लघु कथा) हा एक ट्रेंड सोशल मीडियावर पहायला मिळतोय.. *लघुकथेच्या नावाखाली सुविचार, सल्ला, आणि काहीही लिहून पाठवलेलं पाहायला मिळालं, *अलक मध्ये कथा फारशी नाही दिसली.*
माझ्या एका मित्राने दिलेल्या आव्हानावरून आज *04 अलक* लिहितोय.. त्यातही फारसा न हाताळलेला *भयकथा* हा फॉरमॅट वापरला आहे.. आवडल्या तर शेअर करा.
1) लाईट गेल्याने उकाड्यामुळे त्याला रात्री जाग आली, शेजारच्या रुमला कुणीतरी बाई गोड आवाजात अंगाई म्हणत होती आणि तिचं मुलं मात्र खुदू खुदू हसत होतं!! चटकन त्याच्या लक्षात आलं... तो बोईज हॉस्टेलला राहतोय आणि तो रहात असलेल्या पाचव्या मजल्यावर कोणीही राहायला आलेलं नाही!!! लाईट नसल्याने लिफ्ट बंद असेल.....
2) प्रचंड थंडीचे दिवस.. तुम्हाला रात्री अचानक जाग येते.. परत झोप काही येत नाहीये.. मंद प्रकाशात तुम्ही बेडवर उठून बसता.. सहज आरशात स्वतःला न्याहाळता, इतक्यात तुमची सुंदर पत्नी तुम्हाला मागून येऊन गच्च बिलगते....
.....
जी पंधरा दिवसांपूर्वी मरण पावलेली असते!!!
3) तो आणि ती आकण्ठ प्रेमात बुडालेली.. लग्नही ठरलंय फक्त त्याचे पेरेंट्स बाहेरून येणार म्हणून लग्न पुढं जातंय, तिच्या घरी सांगण्याचा प्रश्नच नाही, पळून लग्न करायचं ठरलंय, एका सायंकाळी त्याचे पेरेंट्स आले दोघ छान तयार होऊन भेटायला गेली!! छान जंगलात घर आणि मस्त कँडल लाईट डिनर असा बेत होता.. काही वेळानं बंगल्यातून तीन धूसर आकृत्या बाहेर पडून गेल्या..
दुसऱ्या दिवशी सकाळी जंगलात तीच बेवारस प्रेत मिळालं.. गळ्यावर दातांच्या खुणा आणि शरीरातलं सगळं रक्त शोषून घेतलेलं!!
४) तुफान पावसाळी रात्री मॅक गाडी चालवतोय, रस्ता पूर्ण निर्मनुष्य, रस्त्याच्या दोन्ही बाजूला कबरस्तान!! अचानक एक पाद्री (फादर) गाडी थांबवतो, केस विस्कटलेले, कापडयांना रक्त लागलेलं, विचित्र दिसणारा, "माय चाईल्ड मला लिफ्ट दे, गावात सोड" घाबरलेला मॅक त्याला गाडीत घेत नाही. थोडं पुढे एक पोलीस उभा आहे, त्याची गाडी बंद पडलीय, मॅक त्याला लिफ्ट देतो आणि फादर ची हकीकत सांगतो, आता पोलिसाची मान पूर्ण गोल (360 डिग्री) फिरतेय.. पोलीस सांगतो.. तो पाद्री होता चर्च चा.. मी सैतान आहे. तो तुला वाचवायला आला होता!!!
No comments:
Post a Comment