नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी ...
बसले होते एकत्र, चहा पीत
गप्पा सुरु होत्या.....
देशहिताच्या!!!
स्त्री भ्रूण हत्या.. हा झाला होता इतिहास
आणि स्त्रीया बिनधास्त फिरत होत्या रात्री
राजधानी दिल्लीत..
बलात्काराचं भय न बाळगता!!
हिंदू मुस्लिम आनंदाने बांधत होते
एकमेकांची प्रार्थनास्थळे आणि
ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र असं काही असतं
हे नव्या पिढीला माहीतच नव्हतं!!
काश्मीर झालं होतं पुन्हा नंदनवन
पूर्व भारत आहे निरव शांत.. पूर्वीसारखा
निर्भय झालीत अभयारण्य...शिकारी
आता बनलेत निसर्ग रक्षक!!!
उपाशी झोपणारी मुलं आता,
शाळेत जातात..गिरवतात जीवनाचे धडे
आणि शेतकरीही कसतोय जमीन नव्या जोमानं
आत्महत्येचा फास बाजूला टाकून..
काय म्हणता?? स्वप्न असेल हे??
स्वप्नचं असावं बहुतेक..
किंवा भाबडा आशावाद म्हणा हवंतर
पण मानव जिवंत राहतो याच आशवादावर!!
'नवं स्वप्न' स्वप्नातच रहायला नको असेल तर..
आपल्या सगळ्यांची पावलं पडायला हवीत
एकत्र...एक दिशेने, एक दमाने,
आणि पूर्ण जागेपणी!!!
No comments:
Post a Comment