भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर श्री रघुराम राजन यांची इंग्लंडच्या रिझर्व्ह बँक गव्हर्नरपदी नेमणूक.....
बातमी लहानशी, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी!!
बातमी ट्विटर या सोशल मीडियावरून प्रसिध्द करणारे प्रस्थ होते माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार शशी थरूर!!!
दोन्ही नाव बडी आणि शंका घ्यायला जागा नसलेली होती मग काय?? सोशल मीडियावर धुमाकूळ सुरू झाला. रघुराम राजन यांच्यावर मोदींनी कसा अन्याय केला आणि इंग्लंडने कशी संधी साधली ई. ई. फेसबुक, ट्विटर, व्हाट्सएप युजर्सनी रान पेटवलं
मोदी आणि कंपनीला पुन्हा एकदा खलनायक बनवायची संधी कोण सोडणार???
आणि आज बातमी आली की अशी कोणतीही नेमणूक इंग्लंड बँकेने केलेली नाही...
थरूर सॉरी म्हणून मोकळे झाले पण....
त्याने प्रश्न सुटणार आहे का??
मुळात शशी थरूर (कांग्रेसचे असले तरीही) प्रचंड बुद्धिमान (कारण आजकाल एक गैरसमज आहे की काँग्रेस चे सर्वच वाईट), मुरब्बी, सोशल मीडियात पारंगत नेते आहेत. मोदी लाट येण्यापूर्वी ट्विटर वर सर्वाधिक फॉलोअर्स थरूर यांचे होते (आता बोला) जवळपास 20 हुन अधिक पुस्तके लिहिणारे (त्यातील SHADOWS ACROSS THE PLAYING FIELD, THE FIVE DOLLAR SMILE, THE ERA OF DARKNESS, SHOW BUSINESS उल्लेखनीय) आणि अभ्यासपूर्ण बोलणारे थरूर इतके थिल्लर वागावेत??
की सरकारवर निशाणा साधण्यासाठी थरूर यांनी ही चिप ट्रिक वापरली?? बरं थरूर यांच्या ट्विटमुळे, साधी बँकेची स्लिप न भरता येणारा गण्यासुद्धा राजन यांच्या बाजूने आवेशाने मोदींना एकेरीत शिव्या घालत होता.
प्रश्न मोदींचा नाहीच... प्रश्न आपण सोशल मीडियावर कोणा क्ष व्यक्तीच्या तालावर नाचणारी माकडे झालो आहोत का हा आहे.
No comments:
Post a Comment