जर्मनी मधून आलेला एक पर्यटक..
भारताविषयी अनेक किन्तु - परंतु मनात घेऊन!! यु ट्युब, गुगल वर पाहिलेला भारत आणि प्रत्यक्षातील भारत कसा असेल, मनात अपार कुतूहल... आणि खूप काही...
भारतातील त्याच्या मुक्कामात त्याचा सेल फोन हरवतो आणि मग सुरु होतो एक वेगळा प्रवास.. उत्कंठा आणि आशा निराशेचा!!!
ही काही कोणत्या सिनेमाची कथा नाही, ही आहे कोकण रेल्वेत घडलेली खरीखुरी कहाणी
या काहाणीचे हिरो आहेत कोकण रेल्वेचे Head Ticket Examiner श्री. महेश पेंडसे ( मोबाईल नंबर 7666583675) आणि पर्यटकांचं नाव आहे, जेन, बर्लिन, जर्मनी!! (Mr Jan grenzebach )
या जेनचा, विदेशी पर्यटकाचा मोबाईल हरवल्यावर त्याने आपल्या हरवलेल्या मोबाईलवर दुसऱ्या नंबरवरून फोन लावला.. ज्या व्यक्तीला हा फोन सापडला त्याने फोन उचलालही!!
पण.... कहानी मी ट्विस्ट!!
जेनला त्याची भाषा समजेना!! बावरलेला जेन मदतीसाठी साद घालू लागला, अनेकांनी जेनकडे साफ दुर्लक्ष केले, काहीजण मजा बघत राहिले, पोकळ सहानुभूती दाखविणारेही अनेक!!
दरम्यान त्याचवेळी कोकण कन्या एक्सप्रेस मध्ये ड्युटी बजावणाऱ्या श्री. महेश पेंडसे यांनी आपली कामाची जबाबदारी पूर्ण करतानाच जेनला धीर दिला, मोबाईल शोधून देण्याचं आश्वासन दिलं! आपले काम आटोपल्यावर खरोखरच पेंडसे यांनी जेनच्या हरवलेल्या फोनच्या शोध मोहिमेवर वाहून घेतले!! अनेक वेळा फोन लाऊन ज्याला जेनचा फोन सापडला त्या व्यक्तीला मुंबईतून शोधलं!! आणि स्वतः फोन कलेक्ट करण्यासाठी निघाले!!
आणि... कहानी मे पुन्हा ट्विस्ट!!!
ज्याला फोन सापडला त्याने फोन बंद केला होता!! मग सतत फोन लावणं सुरू झालं पेंडसेंच्या मनात भीती!! फोन नाही सापडला तर?? जेन ला काय वाटेल?? दोन भारतीयांनी संगनमत करून आपल्याला लुबाडले का??
आशा निराशेच्या आंदोलनातून जाणं आलं. शेवटी एकदाचा 'त्या' व्यक्तीने फोन उचलला, पेंडसे यांनी त्या इसमाला रोख बक्षीस (ते हि स्वतःच खिशातून) देण्याचे वचन दिले आणि फोन न दिल्यास कायदेशीर कारवाईची कल्पनाही दिली!!
शेवटी तो क्षण आला!! फोन महेश पेंडसे यांनी मिळविला, कबुलीप्रमाणे त्या व्यक्तीस रोख बक्षीसही दिले. पुन्हा तत्परतेने जेनला फोन पाठवूनही दिला!!
*जेनला सकारात्मक, प्रमाणिक भारत दिसला*
*प्रत्येक रेल्वे कर्मचाऱ्याला, मराठी माणसाला, भारतीयाला अभिमान वाटावं असं कृत्य केलं आहे महेश पेंडसे यांनी!! कारण पेंडसे इतरांप्रमाणे जेनकडे दुर्लक्ष करू शकले असते, त्याला रेल्वे पोलिसांकडे तक्रार करायला सांगू शकले असते पण श्री. पेंडसे यांनी मानवतेचा मार्ग निवडला!!
पर्यटक वाढतात महेश पेंडसें सारख्या माणसांच्या कृतीमुळे!!
नुसतं फिल्मस्टार ना घेऊन INCREDIBLE INDIA च्या जाहिराती करून नव्हे!!
प्रत्येक चांगल्या कृतीचा सुखांत ठरलेला असतो असं म्हणतात, या कहाणीचाही सुखांत झाला, श्री. जेन यांनी जर्मनीला पोहोचताच आठवणीने पेंडसे यांना एक स्वलिखित शुभेच्छापत्र पाठवून आभार मानले, जेनने आताच्या, इंटरनेटच्या युगात स्वलिखित पत्र पाठविले यावरून त्याच्या भावना आपणाला समजतात. श्री. पेंडसे यांच्या महत्वपूर्ण कामगिरीची दखल पर्यटन विभागाने घ्यावी ही सदिच्छा!!
No comments:
Post a Comment