Pages

Monday, 13 November 2017

bold and beautiful

बोल्ड अँड ब्युटीफुल 

स्त्रीचा बोल्डपणा म्हणजे अंगप्रदर्शन, टिपिकल चाळवणारे विडिओ करणे किंवा समाजमन दुखावेल असं स्टेटमेंट देणे. विवाहसंस्था, देवधर्म, यावर बेछूट टीका करणं असं काहीसं समिकरण... बोल्ड स्त्रिया म्हटल्यावर आपली नजरेसमोर मर्लिन मन्रो ते अँजेलिना जोली व्हाया शेरॉन स्टोन ते मॅडोना किंवा भारतात म्हणायच झालं तर झीनत ते सनी लिओन व्हाया ममता कुलकर्णी ते पूजा भट ई. येत असतील तर असू देत, पण या लेखाचा बाज जरा वेगळा आहे. 
         "माझ्या शरीरावर हक्क फक्त माझाच", हे सांगण्यासाठी कोणत्याही समाजमान्य माध्यमाची मदत न घेता एखादा बोल्ड व्हिडीओ बनविणारी अभिनेत्री असो किंवा उत्तान, सेक्स विषयक काहीतरी लिहून प्रसिद्धी मिळविणारी लेखिका असो. याना समाजात बोल्ड म्हणून प्रसिद्धी मिळत राहते. पण..... स्त्रीची बोल्ड पणाची व्याख्या इतकी मर्यादित असावी का 

       नाझी अमानुषतेला बळी पडताना उमलत्या वयातील तरल भावना शद्बबद्ध करणारी ऍन फ्रॅंक बोल्ड नाही?? दीडशहाण्या इंग्रज राजकारण्यांवर अंकुश ठेवणारी आयर्न लेडी मार्गारेट थॅचर, भौतिक आणि रसायनशास्त्र या दोन्हीतही नोबेल मिळविणारी एकमेव  स्त्री , 'बाई ' असण्याचा सगळं त्रास सहन करत स्वतः वर दुर्धर आजार ओढवून घेऊनही केवळ संशोधनाला सर्वस्व वाहिलेली मेरी क्युरी या खऱ्या अर्थाने बोल्ड आणि ब्युटीफुल. 

पुढे वाचूया.... 


     जिनं स्वतः अंध आणि मूक असतानाही 'त्या ' काळात इतकं भरीव कार्य करून ठेवलंय की  केवळ दिव्यांग बांधवांनीच नव्हे तर सर्वानी तिचा  घाव्या, ती हेलन केलर  कोणत्याही लेखकाला  वाटावा  ( स्त्री किंवा पुरुष ) असं बिनधास्त आयुष्य जगलेली आणि जिच्या ४० लाखहून अधिक  पुस्तकांच्या प्रतींची  जगभर विक्री झाली (खरच) ती अगाथा ख्रिस्ती,स्वतःच्या भयानक परिस्थितीवर मात करत, अनेक शारीरिक मानसिक आघाताना तोंड देत 'द नंबर वन अँकर' बनणारी ओप्रा विन्फ्रे हि (रूढ अर्थाने ब्युटीफुल) नसूनही बोल्डपणाच्या व्याख्येत  अग्रेसर असू शकत नाही  का?? 
   युरोपातील आर्थिक संकटाना आणि विस्थापिथानच्या लोंढ्याच्या प्रश्नांना खंबीरपणे तोंड देत जर्मन सांभाळणारी अँजेला मार्केल या मला भावलेल्या काही बोल्ड स्त्रिया... वय आणि खेळाचा संबंध भिरकावून लावत तब्बल १८ ग्रँडस्लॅम आणि ३८ आंतरराष्ट्रीय डबल्स गेम जिंकणारी मार्टिना नवरातिलोवा किंवा स्वप्नवत कामगिरी करत १९ ग्रँडस्लॅम जिंकणारी सेरेना विलियम्स यांचा फिटनेस निश्चितच ब्युटीफुल. 
     स्त्रीत्वाचं ओझं न मानता, आपल्या वैगुण्यावर मात करत सिकंदरालाही लाजवेल अशी अश्वमेघ कामगिरी करणाऱ्या स्त्रियांना आणि त्यांच्या आंतरिक सौंदर्याला अर्पण!!!!
 बी बोल्ड बी ब्युटीफुल!!!


No comments:

Post a Comment