Pages

Monday, 23 September 2019

मंदी

आज नेमकी भेटली ती
आलिशान गाडीतून उतरत होती
वक्ष ते नितंब अगदी भरलेली.. गोल गरगरीत
'हाय, मी मंदी ....पुन्हा आलेय' तोऱ्यात म्हणाली
सोन्यानं मढलेली, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स ल्यालेली, आलिशान कार मधून आलेली, मग्रूर...'नवी मंदी'
तिच्या पदराआड होते चार दोन भिकार** अर्थतज्ञ, आंबट चेहऱ्याचे टकलू सी इ ओ, दिडशहाणे डावे आणि सत्ता ओरपुन माजलेले राजकारणी बैल!!
अच्छा, म्हणजे तू स्वतः नाही आलीस.. यांनी तुला आणलंय,
मी नकळत बोलून जातो.
लगेच टकलू सी इ ओ'ज कसले कसले अहवाल दाखवत सुटले, अर्थतज्ञ आणि डावे आकडेवारी सांगत सुटले. बैल मान हलवत डुरकत म्हणाले, 'चल बाजार बघू, मंदी सगळ्यांची आहे' 'बाजारात' सगळीकडेच माझी चर्चा आहे, चल, माझं अस्तित्व दाखवते..' नखरेल हसत मंदी म्हणाली.
सो कॉल्ड सोफास्टीकेटेड 'ते' आणि येरागबाळा 'मी'
वरात चालली.

शेतजमिनींचे लचके तोडून अनेक मजली टॉवर्स उभे होते, ते खपत नव्हते 'रिअल इस्टेट(?)' मध्ये मी आहे, लाखो, करोडो वहानं रस्त्यावर धावत असताना नवी लाखो वहानं विकली जात नाहीयेत म्हणजे मी तिथेही आहेच. इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स माणसांपेक्षा जास्त आहेत पण अजूनही राक्षसी गतीने त्यांचं उत्पादन होतंय, त्यांची विक्री मंदावलीय म्हणजे मी आहेच शो रूम्स ओस पडताहेत, फाईव्ह स्टार मध्ये लोक जात नाहीत, बार आणि स्पा, ब्युटी केअर्स उत्पादने पडून आहेत, महागडे कपडे, ज्वेलरी, गिफ्ट्स ऍटम सर्वच तर शांत आहेत तरीही माझं अस्तित्व नाकारतोस??

'बये, तुझं बरोबर आहे पण जरा माझंही ऐकून घे'
भाजीवाल्या मामीकडे गेलो तर मामी म्हणते 'ही कोन बया मंदी, मी नाय वलखीत'
पानवाला भैय्या तर औरच 'कौन मंदी, हमार धंदा तो फुले फले है'
जेटीवरचा मासेवाला चाचा म्हणाला 'खुदा की मेहेरबानी से सब ठीक है, बस कुछ बे गैरत लोग समंदर पुरा साफ कर रहे है, दिन रात मछली, एल इ डि/नये तकनिक से समंदर लुटे तो खुदा कहर बरसायेगा ना??
पुरात बुडालेला, कर्जाच्या ओझ्याने वाकलेला, निसर्गानं नाडलेला शेतकरी पुनः पेरणी करताना म्हणाला, "काऊन मंदी बे?? ते तर माज्या म्हशीचं नांव है"
मजूर, रिक्षा, टॅक्सी वाले, पगारदार, सलून वाले बंधू, मेकॅनिक कुणीच मंदीला ओळखत नव्हतं.
रागानं गाडीत बसत सी इ ओ म्हणतो, रासकल्स, ही डझन्ट नो टार्गेट्स, देशाचं कठीण आहे म्हणत अर्थतज्ज्ञ आणि डावे पळाले,
माजोर्डे नेते मात्र हसत म्हणाले... भक्त दिसतोय,
मंदीही सहेतुक हसली
" होय... भक्त आहेच...देशभक्त!! माझ्यासारखे करोडो आहेत. या मंदिला पळवून लावतील, आणि हो, गांधीजींचा 'खेड्याकडे चला' हा मंत्र पाळून खेडी स्वयंपूर्ण केली असतीत तर आज बाजारात मंदीच्या पदराआड तोंड लपवून फिरायची वेळ नसती आली."
हे वाक्य ऐकायला मात्र ना मंदी होती ना तिचे दलाल!!

अमित सामंत

No comments:

Post a Comment