इसवी सन पूर्व.. 2017 . (2017 B C)
तो... प्रतिभाशाली शिल्पकार, देश विदेशातील राजांपर्यंत त्याची ही कीर्ती पोहोचलेली... अनेक राजपरिवारातील सदस्यांच्या हुबेहूब मूर्ती त्यानं तयार करून दिलेल्या!! जणू जन्मानुजन्म तो फक्त मूर्तीच घडवतोय, सुबक, सजीव, देखण्या!!!
मनमानी, बेधुंद जगणारा, पैसा मानमतराब उधळून लावणारा कलंदर!! खूप वर्ष कसलीच मूर्ती घडवायची इच्छा न झाल्याने तसाच देशीदेशी फिरतोय!! अचानक 'त्या' राज्यात आल्यावर एका आंतरिक ओढीनं तिथल्या राजाला जाऊन म्हणतो ''मला एखादी मूर्ती बनवायची, जी सर्वोत्तम असेल, ती मूर्ती तुम्हाला आणी प्रजेला आवडली तर मी मागेन ते द्यायचं नाही आवडली तर मला मृत्युदंड द्यायचा!!'"
विचित्र अट... स्वतःच्या नकळत तो बोलत राहिला, कसलीही शुद्ध नाही फक्त एक अनावर ओढ!!!
ती.... राजाची सर्वात प्रिय राणी!! वयाने राजापेक्षा लहान, युद्धात 'जिंकून' घेतलेली!! पण आता त्याची प्राणप्रिय असलेली!! राजा ठरवतो शिल्प बनवायचं तर हिचचं... भूलोकीची अप्सरा या शिल्पातून अजरामर राहील!!
शिल्प बनायला सुरुवात होते!! ती रोज अनावर ओढीनं त्या राजवाड्याजवळ किल्ल्यात येऊन बसायची.. तो शिल्पकार बेदरकारपणे तिच्या सौन्दर्यकडे फार लक्ष न देता फक्त आपल्या शिल्पात मग्न!! दोघांनाही मात्र एकमेकांच्या भेटीची अनावर ओढ!!! स्पर्श, भाषा, आकर्षण रहित प्रेमच जणू!!!
का?? माहित नाही पण ती ओढ मात्र दोघानाही जाणवते!! जन्मानुजन्मांच राहिलेलं प्रेम असावं तशी, दोघांनी समोरासमोर राहावं अगदी युगानुयुगं, बाकी काही नको!!
"हाथ दगडी शिल्पावर कमी फिरताहेत आणि जिवंत शिल्पावर जास्त..." दुसऱ्या राणीने आपलं काम चोख बजावलं!!
राजाला वचन आठवलं मूर्ती प्रजेला आवडली तर???
शिल्पाचे फक्त डोळे कोरायचे राहिले होते... अचानक एके दिवशी विक्षिप्त राजाने " मूर्ती आवडली नाही" म्हणून एका पौर्णिमेला शिल्पकारास मृत्युदंड दिला आणि " नजरेतून उतरलेल्या आवडत्या राणीला" भिंतीत जिवंत गाडून त्यावर तिचीच डोळे न रेखलेली मूर्ती बसविली!!
ती..... अनेक शतके त्याच शिल्पात राहून त्याची वाट बघत राहिली!!
तो.... वेगवेगळ्या देशात अनेकदा जन्म घेऊन शिल्पकला जोपासत राहिला!!
सन 2017....
ख्यातनाम ग्रीक पुरातत्व अभ्यासक म्हणून तो त्याचं किल्ल्यात आला, तीच अनावर ओढ, तेच संशोधन करायला मिळावं म्हणून सरकारशी भांडण, त्या किल्ल्यातच त्यानं बस्तान बसवलं!!
एका पौर्णिमेच्या रात्री अचानक त्याला खूप अस्वस्थ वाटू लागतं, संपूर्ण किल्ला फिरून तो त्या शिल्पाजवळ येतो, त्या शिल्पाचा स्पर्श मानवी, उबदार वाटतो, आपल्या पिशवीतून काही अवजारे काढून तो त्या मूर्तीचे डोळे कोरतो!!!
त्या दिवसापासून त्या मूर्तीच्या डोळ्यातून अखंड अश्रू वहाणं सुरु होतं!! विज्ञानाला कोड सुटत नाही
तो मात्र त्या मूर्तीचे डोळे टिपायला याच देशात थांबतो ... अगदी कायमचा!!!
No comments:
Post a Comment